Ad will apear here
Next
‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार जाहीर
लेखक सलीम खान, नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर मानकरी

मुंबई : कला, नाट्य, संगीत आणि सामाजिक क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी, ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान’तर्फे देण्यात येणाऱ्या ‘मास्टर दीनानाथ’ पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. प्रसिद्ध लेखक सलीम खान, नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर हे यंदाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.

२४ एप्रिलला मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रतिष्ठित मंगेशकर कुटुंबाकडून दरवर्षी दिले जाणारे हे पुरस्कार सर्वच क्षेत्रांतील कलाकारांसाठी एक आनंदसोहळा असतो. शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांना या वर्षीचा संगीत आणि कला क्षेत्रातील ‘मास्टर दीनानाथ’ पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असून लेखक सलीम खान यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

याशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिग्दर्शक मधूर भांडारकर यांना ‘दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार’ देण्यात येणार असून ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या बहुमूल्य योगदानासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा ‘वाग्विलासिनी’ हा पुरस्कार प्रसिद्ध लेखक वसंत आबाजी डहाके यांना देण्यात येणार आहे. 

भद्रकाली प्रॉडक्शनच्या ‘सोयरे सकळ’ या नाटकाला, ‘मोहन वाघ’ पुरस्काराने वर्षातील सर्वोत्तम नाटक म्हणून गौरवण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तालयोगी आश्रमचे पंडित सुरेश तळवळकर यांना ‘आनंदमयी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक विजयकुमार यांना त्यांची संस्था ‘भारत के वीर’साठी सन्मानित केले जाणार आहे. प्रतिष्ठानने या वेळी हा पुरस्कार पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना समर्पित करण्याचे ठरवले आहे. विशेष बाब म्हणजे सोहळ्यात शहिदांच्या नातलगांना एक कोटी रुपयांचे साह्य देण्यात येणार आहे.

मास्टर दीनानाथ मंगेशकर‘सीआरपीएफ’चे महासंचालक विजयकुमार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते यंदा हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृती जपण्यासाठी मंगेशकर कुटुंबामार्फत ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार सोहळा’ आयोजित केला जातो. त्यात विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाते. 

‘आम्ही करत असलेल्या या कार्याला लोकांचा भरभरून पाठिंबा मिळतो, तसेच मोठ्या प्रमाणात सहकार्यही मिळते’, अशा भावना पं. हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी व्यक्त केल्या आहेत. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZQEBZ
Similar Posts
अरुजा रहाळकरच्या ‘अरंगेत्रम्’ने प्रेक्षक मंत्रमुग्ध पुणे : सोनचाफ्याचा मंद दरवळ... समईच्या मंद उजेडात चमकणारी नटराजाची मूर्ती, मृदुंगमचा ताल आणि व्हायोलिनचे सूर, दाक्षिणात्य थाटातील गायन आणि त्याच्या तालावर मनोहारी विभ्रम करत लयीत, डौलदारपणे पदन्यास करणारी ती नर्तिका आणि मंत्रमुग्ध होऊन पाहणारे प्रेक्षक... हे दृश्य होते भरतनाट्यम नृत्यांगना अरुजा रहाळकर हिच्या अरंगेत्रम सादरीकरण सोहळ्यातील
‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश मुंबई : आर. बी. के. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये सातवीत शिकणाऱ्या आदित्य श्रीवास्तव या विद्यार्थ्याला ‘नॅशनल अचिव्हर्स अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. एक हजार रुपये, ‘मॅप माय स्टेप डॉट कॉम’चे प्रीपेड स्क्रॅच कार्ड, सीडी, सुवर्णपदक व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याने नॅशनल लेव्हल
उलगडले समकालीन हिंदी कवितांचे जग दादर (मुंबई) : साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे ‘कवितासमय’ ही वर्तमानातील अस्वस्थता व्यक्त अरणाऱ्या समकालीन हिंदी कवितांची मैफल १० मार्च रोजी दादरच्या साने गुरुजी विद्यालयात झाली. या कार्यक्रमाची संकल्पना ज्येष्ठ कवी, चित्रकार, समीक्षक गणेश विसपुते यांची होती
शिवसेनेची सावध पावलं, महापौरपदासाठी गट स्थापन.. मुंबई महापालिकेत महापौर कुणाचा? या प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणाकडेच नाही. मात्र शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि शिवसेनेला समर्थन दिलेले अपक्ष नगरसेवक आज कोकण भवनावर जाऊन गट स्थापन करणार आहेत. महापौर निवडीच्या दिवशी दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललं आहे. शिवसेना आणि भाजप

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language